कोरोनाच्या डेल्टा प्लसची देशात दहशत बसली असताना आता रोगाचा देशातील पहिला बळी गेला आहे. मध्य प्रदेशात आतापर्यंत डेल्टा प्लसचे पाच रुग्ण आढळले आहेत.

महिलेचा पती सुरक्षित

देशभरात डेल्टा प्लस या म्युटेन्टचे रुग्ण आढळत आहेत. त्यातच मध्य प्रदेशातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. उज्जैनमध्ये या विषाणूची बाधा झालेल्या महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.

विशेष म्हणजे या महिलेच्या पतीने कोरोनाप्रतिबंधक लस घेतली होती, तो मात्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे.

Advertisement

चिंता वाढली

कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर या महिलेच्या जिनोम सिक्वेंसिंगसाठी नमुना घेण्यात आला होता. त्यानंतर या महिलेला कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची बाधा झाल्याचे समोर आले.

डेल्टा व्हेरियंटचा हा पहिलाच मृत्यू असल्याने चिंता वाढली आहे. राज्यातील डेल्या प्लस व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

महिलेने घेतली नव्हती लस

महिलेने लसीचा एकही डोस घेतला नव्हता. मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग म्हणाले, की ‘सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. डेल्टा प्लसने बाधित झालेल्या रुग्णांची कॉन्टक्ट ट्रेसिंग करण्यात आली आहे.

Advertisement

राज्यातील सर्व रुग्णालयांना खबरदारी घेण्यास सांगण्यात आलं आहे. मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आणि जिनोम सिक्वेंसिंग करण्यात येत आहे. त्यामुळे तत्काळ कोरोना रुग्णांची, विषेश करुन डेल्टा प्लस व्हेरियंटने प्रभावित झालेल्या लोकांची ओळख पटवता येईल.