गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे विधिमंडळाची अधिवेशने अल्पकाळाचीच होत आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन पूर्णकाळ चालवा अशी मागणी पुण्यातील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पत्र

शिरोळे यांनी त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यापुढे राजकीय, सामाजिक तसेच शेती, औद्योगिक, आरोग्य, शिक्षण याविषयिचे प्रश्न उभे राहिले आहेत. यावर सा़गोपांग चर्चा होण्याकरिता विधीमंडळाचं पूर्ण काळ अधिवेशन घेतलं जावं, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.

पूर्णकाळ अधिवेशन आव्हानात्मक नाही

कोविड प्रतिबंधक लसीचा ठोस पर्याय आपल्यापुढे आहे. अशावेळी कोविडच्या कारणाने अधिवेशन अल्पकाळात उरकण्यात येऊ नये अशी मागणी शिरोळे यांनी केली आहे.

Advertisement

महाराष्ट्रामध्ये जवळपासळ निम्मे आमदार आणि बहुसंख्य कर्मचा-यांनी लसीचे डोस घेतलेले आहेत. उरलेल्यांना पहिला डोस देण्यात यावा. हे काम फार आव्हानात्मक नाही. राज्य सरकारने तयारी दाखवली तर सहज शक्य आहे, असं शिरोळे यांनी म्हटलं आहे.