आ.जगताप यांच्या नावे पैशाची मागणी

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं. हॅक झालेल्या फेसबुक अकाऊंटवरुन वैयक्तिक मेसेज पाठवून पैसे किंवा इतर वस्तूंची मागणी केली जात आहे.

मागण्यांना उत्तर देऊ नका

जगताप यांच्या नावे सोशल मीडिया अकाऊण्टवरुन पैशांची मागणी केली जात आहे. त्यामुळे आपल्या अकाऊण्टवरुन होणाऱ्या हॅकर्सच्या कोणत्याही मागण्यांना उत्तर देऊ नका, असं आवाहन जगताप यांनी केलं आहे.

काय आहे प्रकरण ?

हॅक झालेल्या फेसबुक अकाऊंटवरुन वैयक्तिक मेसेज पाठवून पैसे किंवा इतर वस्तूंची मागणी केली जात आहे.

फेसबुक अकाऊंटवरुन वादग्रस्त पोस्ट किंवा पैशांची मागणी करणे, असे प्रकार घडल्यास, कोणीही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन जगताप यांनी ट्विटरद्वारे केले आहे.

कोण आहेत लक्ष्मण जगताप?

लक्ष्मण जगताप पिंपरी चिंचवडमधून भाजपचे आमदार आहेत. 2009 ते 2014 या काळात जगताप चिंचवड मतदारसंघातून अपक्ष आमदार होते.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत जगताप यांनी शेकापकडून श्रीरंग बारणेंविरोधात शड्डू ठोकला होता; मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून मैदानात उतरले.

मिरा भाईंदरच्या आमदारांच्या नावे पैशांची मागणी

यापूर्वी, मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट खाते तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता.

गीता जैन यांच्या नावे बनावट व्हॉट्सअॅप अकाऊण्ट तयार करण्यात आले होते. या व्हॉट्सअॅप नंबरवर आमदार गीता जैन यांच्या नावासह फोटो जोडण्यात आला होता.

फेसबुकचा आधार घेत शहरातील काही नागरिकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप करुन पैशांची मागणी करण्यात आली होती.