Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

अलपवयीन मुलाकडे खंडणीची मागणी

अल्पवयीन मुलाला बोलावून घेऊन त्याच्याकडे दीड लाखांची खंडणी मागणा-या तिघांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पैसे देण्यास नकार दिल्याने चौघांनी या मुलाला लाकडी बांबूने मारहाण केली.

हे आहेत आरोपी

रोहन गुंजाळ (वय १९, रा. येरवडा), चेतन रणपिसे (वय २०, रा. येरवडा), आशुतोष भुजबळे (वय १९, रा. भैरवनगर, धानोरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ही घटना धानोरीतील भैरवनगरमध्ये घडली होती. अखिल पलांडे (वय २६, रा. मुंजोबा वस्ती, धानोरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

मित्राला खंडणीसाठी मारहाण

या प्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलाने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आरोपी हे फिर्यादीचे मित्र आहेत. आरोपीने फिर्यादीला बरोबर घेऊन भैरवनगर येथे आणले. अखिल पलांडे याने तुझ्याकडून दीड लाख रुपये घेण्यास सांगितले आहे, असे सांगून पैशांची मागणी केली.

त्याने नकार दिल्यावर चेतन रणपिसे याने लाकडी बांबूने फिर्यादीला मारहाण केली. रोहन गुंजाळ याने पाईपाने मारहाण करून खाली पाडले.

आशुतोष भुजबळ याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीच्या आईला फोन कररून शिवीगाळ केली. सहायक पोलिस निरीक्षक एस़ एम़ निकम तपास करीत आहेत.

Advertisement

 

Leave a comment