ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

दुकानांच्या वेळा बदलण्याची मागणी

शहरातील सर्व दुकाने सकाळी ११ ते रात्री आठ वाजेपर्यंत उघडी ठेवावीत किंवा सातही दिवस सर्व दुकाने सकाळी ११ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवून व्यवसायास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार; तसेच पुणे महापालिका आयुक्तांनाकडे केली आहे.

व्यावसायिकांचे नुकसान

राज्य सरकारने बदललेल्या वेळांमुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने शहरातील व्यवसायाच्या वेळा बदलण्याची मागणी पुणे व्यापारी महासंघाने केली आहे.

राज्य सरकारच्या नवीन निर्बंधांनुसार पुणे शहरात कोरोनारुग्णांची वाढ नसतानाही दुकानांच्या वेळेत बदल करून ती सायंकाळी चार वाजेपर्यंत उघडी ठेवून व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या निर्णयापूर्वी व्यवसायासाठी सायंकाळी सात वाजेपर्यंत परवानगी दिली होती. या कालावधीत सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत दुकाने उघडी असूनही रुग्णसंख्येत वाढ झाली नाही; परंतु कोणतेही संयुक्तिक कारण नसताना अचानक व्यापाराच्या वेळांत बदल करण्यात आला आहे. सततच्या वेळा बदलण्यामुळे व्यापारावर प्रतिकूल परिणाम होत आहे.

व्यवसायाचे तीस तास कमी

शहरातील सर्व व्यावसायिक पूर्णत: व अंशतः लॉकडाउन, वीकएंड टाळेंबदीच्या निर्बधांचे पालन करीत आहेत. सध्याच्या आदेशानुसार सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत कधीही, कोणीही अत्यावशक वस्तू सोडता इतर वस्तू खरेदीसाठी बाहेर पडत नाही.

दुकाने सकाळी १० वाजता उघडली जातात व सायंकाळी चार वाजता बंद केली जातात. म्हणजे फक्त सहा तासच व्यवसाय करण्यास मिळतात. पूर्वी रात्री नऊ वाजेपर्यंत दुकाने उघडी होती.

म्हणजे व्यवसायाचे पाच तास दर दिवशी कमी झाल्यामुळे सोमवार ते शुक्रवार या दिवसांचे ३० तास कमी झाले असल्याचे व्यापारी महासंघाने सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.

‘फक्त दीड दिवस व्यवसाय’

सध्याच्या निर्बंधांनुसार शुक्रवारी सायंकाळी चारनंतर ते सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत व्यवसाय बंद ठेवावा लागतो.

म्हणजेच आठवड्यातील फक्त दीड दिवसच व्यवसाय करण्यास मिळत आहे, याकडे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी लक्ष वेधले.

 

You might also like
2 li