पुणे – नुकतीच उन्हाळ्याची चाहूल लागली असताना पाऊस (Rain) पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. यामुळे ऐनवेळी पाऊस (Rain) पडणार असून अश्यातच आरोग्य विभागाने पुणेकरांना काळजी घेण्याचे आव्हान केलं आहे. हलक्या सरी सुरू झाल्याने डेंग्यूच्या (Dengue) संशयित रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितलं आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार (Meteorological Department) पुढी काही दिवस पावसाचा (Rain) हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पुणे शहरात तर काल अक्षरशः पावसाने थैमान घातले होते.

दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या स्वाइन फ्लू, डेंग्यू (Dengue Fever) आणि दीर्घकाळ चालणाऱ्या सर्दी-खोकला-तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वातावरणातील विचित्र बदलांमुळे देखील हा परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यंदा जानेवारी ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत राज्यात 3585 रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला. राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, स्वाइन फ्लूचे राज्यातील सर्वाधिक 1228 रुग्ण आणि 46 मृत्यू पुणे जिल्ह्यात आहेत.

नागपूरमध्ये 524 रुग्ण आणि २८ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. नाशिकमध्ये 244 रुग्ण आणि 15 मृत्यू, ठाण्यात 564 रुग्ण आणि 16 मृत्यू तर सातारा आणि कोल्हापूरमध्ये अनुक्रमे 45 आणि 192 रुग्ण तसेच 13 आणि 19 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी देखील स्वतःची आणि दुसऱ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

डेंग्यू म्हणजे काय? कसा होतो प्रसार, काय आहेत लक्षणे?

डेंग्यू तापाची लक्षणे :

1. उच्च ताप
2. डोकेदुखी
3. डोळा दुखणे
4. स्नायू आणि सांधेदुखी
5. थकवा
6. मळमळ
7. उलट्या होणे
8. त्वचेवर लाल खुणा

डेंग्यू तापावर उपचार :

डेंग्यूसाठी कोणतेही विशिष्ट औषध किंवा अचूक उपचार उपलब्ध नाहीत. यामध्ये काही घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त पाणी प्यावे.

अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णाला इलेक्ट्रोलाइट पूरक आहार दिला पाहिजे. काही प्रकरणांमध्ये, रक्तदाब निरीक्षण आणि रक्त संक्रमणाद्वारे देखील उपचार केला जातो. एस्पिरिन किंवा आयबुप्रोफेन सारखी औषधे स्वतःच घ्यायला विसरू नका.