शंभर कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कुटुबीयांभोवती ईडीने फास आवळला आहे.

ईडीने देशमुख यांच्याविरोधात तिसरे समन्स बजावले आहे. त्याविरोधात आता देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

देशमुखांना आज हजर राहावे लागेल

देशमुख यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून तिसरं समन्स बजावण्यात आलं. त्यात देशमुख यांना आज जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement

अशावेळी ईडीचा ससेमिरा रोखण्यासाठी आता देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तशी माहिती देशमुख यांच्या वकिलांनी दिली आहे.

आपल्याविरोधात कारवाई करू नये, म्हणून ही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

चाैकशीला हजर राहण्यास नकार

देशमुख यांना ईडीने दोनदा समन्स बजावलं होतं. आधी त्यांनी प्रकृती ठीक नसल्याचं कारण देऊन ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले होते. नंतर त्यांनी सात दिवसांची मुदत मागवून घेतली होती.

Advertisement

ईडीनं त्यांना समन्स बजावलं असून आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशमुख सोमवारी ईडीच्या चौकशीला सामोरे जातात का ?

याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर आता देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आपल्याविरोधातील कारवाई थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

देशमुखांच्या पीएंना अटक

एप्रिल महिन्यात आधी देशमुख यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्यानंतर आता देशमुख यांची ईडीने चौकशी सुरू केली आहे.

Advertisement

25 जून रोजी ईडीने देशमुख यांच्या पाच ठिकाणांवर छापेमारी केली. त्यानंतर ईडीने देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक केली.

अंमलबजावणी संचालनालय मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली.

देशमुखांच्या मुलालाही समन्स

देशमुख यांच्या पाठोपाठ ऋषिकेश देशमुख यांनाही समन्स आल्यानं चर्चांना उधाण आलं. देशमुख यांना समन्स पाठवण्यात आल्यानंतर आता ऋषिकेश यांना समन्स पाठवण्यात आल्यानं पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Advertisement

दोघांना वेगवेगळ्या तारखांचं समन्स बजावण्यात आलं. ऋषिकेश देशमुख यांना 6 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स आहे.

मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात ऋषिकेशचा हात

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या तपासात सचिन वाझे याच्याकडून आलेला पैसा संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याकडे जायचा.

त्यानंतर तो वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत ऋषिकेश देशमुख यांच्या कंपन्या आणि ट्रस्टमध्ये आल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे या मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात ऋषिकेश याचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Advertisement