महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास होऊनही नियुक्त्या होत नसल्यानं एका युवकानं आत्महत्या केल्याचं प्रकरण ताजं असतानाच पुण्यात पीएमपीएलची वाहकाची परीक्षा पास होऊनही भरती केली जात नाही. त्यामुळं भरतीच्या मागणीसाठी परीक्षा पास झालेल्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.

१२ दिवसांपासून आंदोलन

गेल्या 12 दिवसांपासून पीएमपीएमएलच्या स्वारगेट येथील कार्यालयासमोर वाहकपदाच्या परीक्षार्थीचे आंदोलन सुरू आहे.

2016 मध्ये पीएमपीएमलने वाहक पदासाठी ज्या उमेदवारांची भरती करण्याची हमी दिली होती, ती पूर्ण करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे.

Advertisement

काय आहे प्रकरण ?

पीएमपीएमएलने 2016 मध्ये 4900 वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविली. एक जुलै 2017 रोजी परीक्षा पार पाडली. यात जवळपास 261 उमेदवार पात्र ठरले.

भरती प्रक्रिया टप्याटप्याने राबविण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात चारशे उमेदवार पात्र ठरले. 661उमेदवार वाहक म्हणून रुजू झाले. थोड्या दिवसांनी तिसरी प्रतीक्षा यादी जाहीर झाली.

यात एक हजार 784उमेदवारांचा समावेश होता. मात्र थोड्या दिवसांत देशात टाळेबंदी लागू झाल्याने ही यादी थांबवली गेली.

Advertisement

आधीची यादी ग्राह्य धरण्याची मागणी

पीएमपी प्रशासनने उमेदवारांना टाळेबंदी उठल्यानंतर सेवेत सामावून घेऊ, असे सांगितले असल्याचे उमेदवाराचे म्हणणे आहे; मात्र पीएमपीने ही तिसरी यादी रद्द करून आता पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया राबविले जाणार असल्याचे सांगितल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत.

नव्याने भरती प्रक्रिया न राबविता आधीच्या प्रक्रियेतील उमेदवाराचा यादी ग्राह्य धरावी, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे.

 

Advertisement