माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीकडे चाैकशीसाठी आठ दिवसांची मुदत मागितली असली, तरी ईडीकडून या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही; परंतु मुदतवाढ मागून आणि कागदपत्रांची यादी विचारून देशमुख अधिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

ईडीने त्यांना पाठविलेल्या कागदपत्रांच्या यादीमध्ये अनेक मागण्या केल्या आहेत. ईडीला देशमुख यांच्या गेल्या पाच वर्षांच्या उत्पन्नाचा तपशील हवा आहे. संपूर्ण मालमत्तेची माहिती आवश्यक आहे.

ईडी कार्यालयात जाण्यास नकार

देशमुख हे मंगळवारी पुन्हा अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. माझं वय झालं असून कोरोना आहे, आजार आहेत. त्यामुळे मी स्वतः ईडी कार्यालयात येऊ शकत नाही.

Advertisement

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीसाठी मी तयार असल्याचं पत्र देशमुख यांनी वकिलामार्फत सोपवलं आहे. इतकंच नाही तर देशमुख यांनी तपासासाठी आठ दिवसांची मुदतवाढ मागितल्याचे ही सांगण्यात येत आहे.

साई संस्थेच्या संबंधाचा मागविला तपशील

साई एज्युकेशनल संस्थेशी त्यांचा काय संबंध आहे, यासंबंधीचे सर्व तपशील त्यांचे स्वीय सहायक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्याकडून मागविण्यात आले आहेत.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख यांच्याकडे सहा मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. या माहितीशी संबंधित कागदपत्रांसह पुढील चौकशी दरम्यान त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

Advertisement