पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्यासंदर्भात बदनामीकारक व आक्षेपार्ह मजकूर लिहून ताे साेशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करणे एका तरुणाच्या चांगलाच अंगलट आलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांची बदनामी केल्या प्रकरणी आता या तरुणाविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. अनिल हरपळे असं गुन्हा (Crime) दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे.

या प्रकरणी लाेणीकंद पाेलिस (Police) ठाण्यात संदीप साेमनाथ सातव (३८, रा. वाघाेली, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनिल हरपळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ९६ कुळी मराठा या ट्विटर आयडी धारक ट्विटरवर देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ट्विट करत होता. “केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र (Devendra fadanvis) जितक्या शिव्या खातात तितक्या कोणी खात नसेल.

काही वर्षात तुमचा नारायण राणे होईल, असे ट्वीट आणि त्यासोबत देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांचे स्टेटमेंट जोडले आहे’. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“तुमच्यासोबत २४ तास सोबत राहणारा, सत्ता भोगणारा व्यक्ती खंजीर खुपसतो, माझ्यासोबत तुम्ही बेईमानी कराल तर मी बदला नक्कीच घेईन,

बेईमानाला जागा दाखवावी लागते, दाखवली, होय मी बदला घेतला, या शिवराळ भाषेत पोस्ट करुन त्याने गृहमंत्री फडणवीस यांची बदनामी केली.

समाजातील दोन गटांमध्ये शांतता, एकोपा, बिघडवण्याच्या उद्देशाने द्वेष भावना वाढीस घालून ट्वीट करुन फडणवीस यांची बदनामी केली, असे तक्रारदाराने म्हटलं आहे.

दरम्यान, याप्रकरणी संदीप सोमनाथ सातव यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारवाई केली आहे. आणि पोलिसांनी या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.