मुंबई : भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी गोवा ते मुंबई एकत्र प्रवास (Travel) केला असल्याची माहिती मिळत आहे. हा एकत्र प्रवास करण्यामागे एक वेगळेच कारण आहे.

भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करताना आपल्याला पाहायला मिळते. पण आता फडणवीस आणि पेडणेकरांच्या एकत्र प्रवासाची चर्चा रंगली आहे.

राज्यातील सर्व पक्षाचे काही नेते गोव्याच्या विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) प्रचारासाठी गोव्यात गेले आहेत. शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) या प्रचारासाठी गोव्यात गेल्या आहेत.

Advertisement

तसेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा गोव्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यात गेले होते. लता मंगेशकर (Lata Mangeshkar Death) यांच्या निधनाची बातमी यांना समजली आणि या दोन्ही नेत्यांची मुंबईला येण्याची लगबग सुरु झाली.

पण पणजीतून मुंबईला येण्यासाठी सकाळी विमान नव्हते. किशोरी पेडणेकर यांना भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांच्या चार्टर प्लेनंने (Charter Plane) मुंबईकडे येत असल्याचे पेडणेकरांना समजले.

किशोरी पेडणेकर यांनी लगेचच देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्यासोबत मुंबईला येऊ देण्याची विनंती केली. या विनंतीचा मान ठेवत फडणवीसांनी किशोरी पेडणेकरांना मुंबईपर्यंत लिफ्ट दिली.

Advertisement

यावेळी देवेंद्र फडवणीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गिरीश महाजन आणि किशोरी पेडणेकर यांनी गोवा ते मुंबई एकत्र प्रवास केला. राजकारणात कितीही वैर असले तरी नेतेमंडळी एकमेकांच्या मदतीला धावून येतात याचाच प्रत्यय यावेळी आला आहे.