पुणे – गेल्या दोन दिवसांपासून भाजपाच्या मिशन बारामतीची (baramati) राज्याच्या राजकाणात चर्चा सुरू आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बारामती दौऱ्यादरम्यान 2024 च्या निवडणुकांमध्ये बारामतीची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. “2024 च्या लोकसभेला महाराष्ट्रात 45 प्लस आणि विधानसभेला 200 प्लस हे सूत्र आम्ही ठरवले’ असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावेळी केलं.

दरम्यान, अश्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील एक मोठं व्यक्तव केलं असून, राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

“आमचे मिशन भारत इंडिया आहे. बारामती महाराष्ट्राच्या बाहेर नाही. मिशन महाराष्ट्र अंतर्गत बारामती आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

सध्या भाजपाने बारामती (Baramati) जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे. नुकतंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा दौरा केला होता.

तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यादेखील बारामती दौरा करणार आहेत. भाजपाच्या या मिशन बारामतीविषयी विचारले असता ते बोलत होते.

‘प्रत्येक निवडणूक शेवटची समजून लढल्यास यश नक्की मिळते’, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यावेळी म्हणाले.’

तसेच, ते पुढे म्हणाले की.., “आगामी निवडणूक आणि जागावाटपाबाबत भाजपा आणि शिंदे गटाचा फॉर्म्युला ठरल्याबाबत ते म्हणाले,

की आम्ही जागा किती लढवायच्या ते तुम्ही ठरवू नका, तुम्ही पंतगबाजी करू नका, आमचे हैदराबाद नाही तर मिशन मुंबई आहे, असेही ते (Devendra Fadnavis) म्हणाले.