मुंबई – महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (maharashtrachi hasyajatra team) कार्यक्रमाला पाहिलं जातं. हास्यजत्रेतील समीर चौगुले, प्रिथ्वीक प्रताप, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात हे दमदार कलाकार आता नागपूरकरांच्या भेटीस आले आहेत. नागपूर दौऱ्यानिमित्त विमानाने प्रवास करताना त्यांची भेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सोबत झाली. देवेंद्र फडणवीस आणि आपले हास्यजत्रेचे कलाकार एकाच विमानाने प्रवास करत होते.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) प्रवासादरम्यान हास्यजत्रा कार्यक्रमाचे मागील भाग पाहत होते. हा निव्वळ योगायोग म्हणावा.

कलाकारांना भेटल्यावर त्यांनी कलाकारांचे, कार्यक्रमाचे आणि सोनी मराठी वाहिनीचे कौतुक केले. त्यांच्या बिझी शेड्युलमध्ये ही ते प्रवासा दरम्यान वा फावल्या वेळेत महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहणे पसंत करतात.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (maharashtrachi hasyajatra team) मधील कलाकारांची नागपूर एअरपोर्टवरील ही ग्रेट भेट कायम लक्षणीय असेल.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेला हा कार्यक्रम असून रसिक मायबाप या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देत आहेत. आता नागपूरकरांच्या भेटीस आलेले हे कलाकार काय कल्ला घालणार हे पाहणं रंजक ठरेल.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा मंच रसिकांना निखळ आनंद देत असून हास्यजत्रेतील एकेक पात्र रसिकांना त्यांच्या घरातलं वाटतं.

त्यामुळे टेन्शन विसरण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (maharashtrachi hasyajatra team) हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र पहिला जातो.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना विनोदाची जाण आहे. राजकीय क्षेत्रात वावरत असताना आपल्या विरोधकांवर टीकेचे बाण सो़डताना कधीकधी फडणवीस विनोदी अंगानेही विरोधकांची खिल्ली उडवत असतात हेही आपण पाहिल आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या कौतुकामुळे समीर चौगुले आणि सहकलाकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल यात शंका नाही.