मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस (devendra fadnavis) सरकारनं बाजी मारली आहे. विश्वासमताच्या बाजूने 164 मते पडली तर विश्वासमताच्या विरोधात 99 मते पडली. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी होती. 

आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानानं बहुमत चाचणी पार पडली. असून, यामध्ये शिंदे गटाने बाजी मारली आहे. त्यामुळे आजपासून राज्यात शिंदेशाही सुरू झाली आहे.

दरम्यान, यावेळी विधीमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी ज्या सदस्यांनी आमच्यावर विश्वास टाकला त्यांचे मी आभार मानतो असे वक्तव्य केलं. तसचे विरोधकांना जोरदार टोला देखील लगावला आहे.

Advertisement

यावेळी फडणवीस म्हणाले, “मी पुन्हा येईन म्हणालो होतो! मी पुन्हा आलोच आणि शिंदेंना सोबत घेऊन आलो, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणालेत.

ज्यांनी माझी टिंकल टवाळी केली, त्यांचा मी बदला घेणार आहे. बदला हा आहे, की मी त्यांना माफ केलंय. प्रत्येकाची वेळ येते, असं फडणवीस म्हणालेत.

“मी पुन्हा येइन, मी पुन्हा येईन, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं अन् ही कविता त्यांच्या नावासोबत जोडली गेली. आणि आज खुद्द देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी विधीमंडळात त्यावर भाष्य केलं आहे.

Advertisement

तसेच, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचं देखील तोंड भरून कौतुक केलं आहे.

“शिंदे हे प्रचंड माणुसकी असणारा, सामान्य जनतेसाठी जीवाची परवा न करता काम करणारा नेता’ असल्याचे म्हणत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं.

Advertisement