मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

दरम्यान, या राजकीय उलथापालथ झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) संघटनेशी युती केली आहे.

आगामी निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) या नवीन सहकाऱ्याला घेऊन आपण खांद्याला खांदा लावून लढणार आहोत, असं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या या युतीवर राज्यातील अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आता या युतीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

“मी यावर एवढंच म्हणेन की विनाशकाले विपरीत बुद्धी” असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. यावेळी फडणवीस प्रसार (devendra fadnavis) माध्यमांशी बोलत होते.

तसेच, फडणवीसांनी (devendra fadnavis) शिवसेनेचा दसरा मेळावा आणि गुलाम नबी आझाद यांची काँग्रेसला सोडचिट्ठी या मुद्द्यांवरदेखील भाष्य केलं.

या म्हणाले फडणवीस, “काँग्रेसमध्ये सध्या काहीच अलबेल नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस पक्षाची स्थिती बुडत्या जहाजासारखी आहे, त्यामुळं अनेक लोकं पक्ष सोडून जात असल्याचे, फडणवीस यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय? म्हणाले…

“आपण एका विचाराने एकत्र आलो आहोत. गेल्या महिन्या-दोन महिन्यांत जे आपल्या विचारांचे आहेत आणि जे आपल्या विचारांच्या जवळपासही येणारे नाहीत असे लोक स्वत:हून मला येऊन सांगत आहेत,

की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. मी स्वागत यासाठी केलं की आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत”. असं ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.