पुणे – महाराष्ट्रातनंतर आता बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी बारामती येथे बोलत होते. ‘हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे, ही भाजपाची रणनिती आहे’. अशी गंभीर टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे.

नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपासोबतची युती तोडून राजदसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यावर विचारले असता शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपले मत व्यक्त केले तसेच भाजपावर टीकास्त्र सोडले.

शरद पवार म्हणाले, “निवडणुकीत एकत्र यायचे, मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घ्यायची घ्यायची आणि हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे, ही भाजपाची रणनिती आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेत (Shivena) फूट कशी पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली. अशीच खेळी बिहारमध्ये सुरू होण्याआधीच नितीश कुमार वेळीच सावध झाले. असं शब्द पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, शरद पवारांच्या या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

‘कमी आमदार असतानाही आम्ही शिवसेनाला मुख्यमंत्रीपद दिलं असून मुळात शरद पवार (Sharad Pawar) यांचं दुख: जरा वेगळं आहे.’ असं ते म्हणाले.

देवेंद्र फडणवी काय म्हणाले…

“शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. त्यांच्याकडे 50 आमदार आहेत. तर आमच्याकडे 115 आमदार आहेत. तसेच शिवसेनेला मुख्यमंत्रीपदही दिले आहे.

काल त्यांचे नऊ आणि आमचे नऊ असे 18 जणांनी शपथ मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मला असं वाटतं की शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे, ते आपल्याला माहिती आहे”. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.