पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी पुण्यात होऊ लागली आहे. या संदर्भातील एक पत्र देखील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना लिहलं आहे. देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणात विजयाची घोडदौड कायम ठेवतील, असं विश्वास ब्राम्हण महासंघाला (brahman mahasangh) आहे. आणि त्यामुळेच ही मागणी करण्यात आली आहे.

सध्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशासाठी वातावरणनिर्मिती करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे.

आणि याच पार्श्ववभूमीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी (Govind Kulkarni) यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (jp nadda) यांना पत्र पाठवले आहे.

या पत्रात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. ही मागणी भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व मान्य करणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

या पत्रात देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कुशल राजकीय व्यक्तीमत्व आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे भविष्य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपला सक्षम नेतृत्त्व देऊ शकणाऱ्या नेत्यांमध्ये जी काही दोन-तीन नावं आहेत, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. असं या पत्रात लिहलं आहे.

दरम्यान, पुण्यातील ब्राह्मण महासंघ 2009 साली काँग्रेसच्या सुरेश कलमाडी, 2014साली अनिल शिरोळे तर 2019साली गिरीष बापट यांच्या मागे उभा राहिला होता.