मुंबई : काँग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपचे (BJP) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या निवासस्थानी मोर्चा काढून आंदोलन (Protest) करण्याचा इशारा दिला होता. यावरच देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलनासाठी मोर्चा काढला असता पोलिसांनी मोर्चा मध्येच अडवला आहे. यामुळे काँग्रेसचे आंदोलन मध्येच फिसकटल्याचे दिसत आहेत.
या सर्व प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही सर्व इथे उत्सफूर्तपणे आलात. त्याबद्दल तुमचं स्वागत. तुम्ही असताना कुणाची हिंमत नाही या ठिकाणी येऊन निदर्शने करतील. पंतप्रधान मोदींनी (pm narendra modi) माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही.
उलट काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे. काँग्रेसने या देशाचा बट्ट्याबोळ केला आहे. नाना पटोले वगैरे हे नौटंकीबाज लोकं आहेत.
त्यांनी कितीही नौटंकी करू द्या. त्याचा काही परिणाम होणार नाही असे म्हणत फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन कारण्याह इशारा दिला होता. पण आता पोलिसांनी त्यांचा मोर्चा अडवल्यामुळे त्यांच्या आंदोलनावर पाणी फेरल्याचे दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस बोलत असताना कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. देवेंद्र फडणवीस आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.