मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे त्यांच्या भाषण शैली बरोबरच आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आले आहे. सध्या सोशल मीडियावर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा ये फिटनेस (Fitness) व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. कॉलेजमधील तरुण धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) या व्हिडिओवर असंख्य प्रतिक्रिया देत आहेत.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे परळीतील एका जिम मध्ये त्यांचा वर्क आऊट (Fitness) करत आहे.

धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करत या धावपळीतून वेळ काढत त्यांनी आपल्या फिटनेसकडे (Fitness) लक्ष दिले आहे.

सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, अनेक नागरिक या व्हिडिओवर आपले मत व्यक्त करत आहे.

दरम्यान, मागील काही महिन्यांपूर्वीच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची प्रकृती बिघडल्या मुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach candy Hospital) भरती करण्यात आलं होतं.

12 एप्रिल रोजी यांना दुपारी अचानक काही अस्वस्थता जाणवू लागली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हा सौम्य हृदयविकाराचा झटका असल्याचं म्हटलं जात होतं.

मात्र तपासण्यांअंती हा हृदयविकाराचा झटका नसल्याचं समोर आलं. रुग्णालयात भरती झाल्यानंतर धनंजय मुंडे यांची अनेक मंत्री आणि नेत्यांनी भेट घेतली होती.

आणि नंतर शनिवारी 16 एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला. तेव्हा पासून धनंजय मुंडे हे आपल्या फिटनेसकडे जास्तीच लक्ष देत आहे.