पुणे – शिवसेनेचे दिवंगत लोकनेते ‘आनंद दिघे’ (anand dighe) यांच्यावर यांच्या आयुष्यावर आधारित असणारा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. दोन दिवसांपूर्वीच म्हणजे 13 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित असून, या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या (Dharmaveer) चित्रपटाने 2.05 कोटी रुपयांचा गल्ला (box office collection) जमवला. तर गेल्या तीन दिवसांत धर्मवीरने 9.59 कोटी रुपये कमावल्याचं कळतंय.

महाराष्ट्रात अजूनही या चित्रपटाचे शोज हाऊसफुल आहेत. ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, पुणे आणि मुंबईतही विविध ठिकाणी हाऊसफुल गर्दी जमवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे.

Advertisement

काल रविवारी या चित्रपटाने 3 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.

मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत

मोहोर उमटवली. रंगभूषाकार विद्याधर बट्टे यांनी या कलाकारांच्या लूकवर विशेष मेहनत घेतली.

Advertisement

दरम्यान, आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देखील हा चित्रपट पाहणार पाहिला, असून त्यांनी प्रसाद ओक आणि संपूर्ण टीमचे तोंड भरून कौतूक केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी सहा वाजता चित्रपटगृहात जाऊन ‘धर्मवीर’ हा चित्रपट पहिला आहे. यावेळी चित्रपटगृहात शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement