ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

ज्या रस्त्यावर नंगानाच केला, त्याच रस्त्यावर धिंड!

पिंपरी चिंचवड : दोन दिवसांपूर्वी पिंपळे निलखच्या ज्या रस्त्यावर दारू पिऊन प्रतीक खरात, चेतन जावरे या दोन गुंडांनी सर्वसामान्यांना वेठीस धरून कोयत्याने मारहाण केली होती, त्याच रस्त्यावर सांगवी पोलिसांनी या दोन्ही आरोपीची धिंड काढून चांगलाच धडा शिकवला.

पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे निलख परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना हातात कोयता घेऊन मारहाण करणाऱ्या गाव गुंडांची पोलिसांनी धिंड काढली.

जिथे ही घटना घडली, त्याच रस्त्यावर सांगवी पोलिसांनी दोन्ही आरोपींची धिंड काढल्याचं समोर आलं आहे. वाकड पोलिसांनी गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडांची अशीच धिंड काढल्याचा आरोप याआधीही झाला होता.

काय आहे प्रकरण?

पिंपळे निलख भागात मद्यधुंद अवस्थेतील दोन युवकांनी दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमाराला रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांच्या गाड्या अडवून त्यांच्यावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

प्रतीक संतोष खरात आणि चेतन जावरे अशी या हल्लेखोर तरुणांची नावे आहेत. विशेष म्हणजे त्या दोन तरुणांपैकी एका तरुणाच्या हातात कोयता होता.

त्यांनी अनेक गाड्यावर हल्ला केला. एक व्यक्तीने या दोन तरुणांचा हा प्रताप मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर पोलिसांनी या हल्लेखोरांना अटक केली. त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

You might also like
2 li