ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची तब्येत पुन्हा एकदा खालावली आहे. रविवारी सकाळी त्यांना मुंबईतील खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दिलीपकुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, डॉक्टरांकडून याबाबत अद्याप काहीही बोलले गेले नाही.

वृत्तसंस्था एएनआय च्या मते दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांनी पुष्टी केली आहे की दिलीप कुमार यांना गेल्या अनेक दिवसांपासून श्वास घेण्यात त्रास होत होता. यापूर्वी ९८ वर्षीय दिलीप कुमार यांना गेल्या महिन्यातच नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि २ दिवसानंतर त्यांना सोडण्यात आले.

Advertisement

गेल्या वर्षी दिलीप कुमारचे 2 भाऊ अहसान खान आणि अस्लम खान कोरोना पॉझिटिव्ह झाले. कित्येक दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी दिलीप कुमार आणि सायरा बानो देखील कोरोना टाळण्यासाठी पूर्णपणे अलिप्त राहून आपल्या आरोग्याविषयी वेळोवेळी काळजी घेत होते.