पुणे : राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार मध्ये काही ना काही वाद सतत होत असतात. अशातच शिवसेनेच्या (Shivsena) एका नेत्याने थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (MP Shivaji Adhalrao Patil) यांनी दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, महाविकास आघाडी आम्ही मान्य केली आहे.

तसेच महाविकास आघाडी सरकार मध्ये जी तत्वे आहेत ती आम्ही पाळतही आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व राहू द्या. आमची दुसरी काहीही मागणी नाही. शिवसैनिकाला सुखाने जगूद्या असेही आढळराव पाटलांनी म्हंटले आहे.

Advertisement

या वेळी बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये गेली २ वर्षे खूप वाईट अनुभव आहे. खेड तालुक्यातील पंचायत समितीचे सभापती (Chairman of Khed Taluka Panchayat Samiti) यांना ६ महिने जेलमध्ये राहावे लागले.

लांडेवाडी येथे होणारी बैलगाडी शर्यत (Bullock cart race) रद्द करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर पहिलीच बैलगाडा शर्यत आम्ही आयोजित केली होती.

इतरांना ते मान्य नव्हते. त्यांच्या डोळ्यात बैलगाडा शर्यत खुपली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी परवानग्या नाकारल्या. हे सगळे कारस्थान जिल्ह्यातील विरोधक आणि प्रशासन मिळून केले असल्याचा गंभीर आरोप आढळराव पाटलांनी केला आहे.

Advertisement

तसेच शिवाजी आढळराव पाटील बोलताना म्हणाले की, शिवसैनिकाला (Shiv Sainik) जगूद्या, त्यांना संपवण्याचा डाव सुरु आहे. आमचे अस्तित्व राहूद्या, आम्हाला मारू नका असेही ते म्हणाले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले, गृहमंत्र्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्याला जी

Advertisement