अनेकदा आपण पाहतो लोक आजारी पडल्यानंतर डॉक्टर त्या पेशंटला नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. नारळ पाणी पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते. याने शरीराच्या अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत होते. पण थंडीत नारळ पाणी पिल्याने मोठे नुकसान होऊ शकते.
नारळ पाणी शरीरासाठी फायद्याचे असण्यासोबतच त्याचे काही तोटे देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊया थंडीत नारळ पाणी पिल्याने शरीराचे काय नुकसान होते ते…
सर्दी- खोकला
तज्ज्ञांच्या मते थंडीत सकाळी किंवा संध्याकाळी नारळपाणी प्यायल्यास सर्दी किंवा खोकला होण्याचा धोका असतो. म्हणूनच थंडीत दुपारीच्या वेळी नारळपाणी प्यावे
रक्तदाब कमी होऊ शकतो
थंडीच्या वेळी रक्तदाब अधिक प्रभावित होतो आणि अशा वेळी अशा रुग्णांनी नारळपाणी पिऊ नये. वास्तविक, नारळाच्या पाण्यात रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म आहेत आणि जास्त पाणी देखील रक्तदाब कमी करू शकते.
वारंवार लघवीचा त्रास
हिवाळ्यात नारळाचे पाणी जास्त प्रमाणात सेवन केल्यास वारंवार लघवीचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच फक्त दुपारी एक ग्लास नारळ पाणी पिण्याची दिनचर्या पाळा.
लूज मोशन होऊ शकते
थंडीच्या काळात नारळाचे पाणी जास्त प्रमाणात सेवन केल्यास लूज मोशनची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे जेव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते तेव्हा असे होते.