पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रमेश थोरात (Ramesh Thorat) हे सलग आठव्यांदा जिल्हा बँकेच्या (District Bank) संचालक (Director) पदी बिनविरोध निवडून आले आहेत. रमेश थोरात अ गटातून निवडून आले आहेत.

राष्ट्रवादीचे अशोक खळदकर (Ashok Khaldakar) आणि भाजपचे अभिमन्यू गिरीमकर (Abhimanyu Girimkar) यांनी वेळेमध्ये फॉर्म माघारी घेतल्यामुळे रमेश थोरात यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

रमेश थोरात हे १९८५ पासून बँकेच्या संकचालक पदी आहेत. गेली ३७ वर्षे त्यांनी बँकेच्या संचालक पदाचा कारभार पहिला आहे. दौंडचे आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul) यांनी निवडणुकीपासून दूर राहण्यालाच पसंती दिली.

Advertisement

थोरात हे बिनविरोध निवडून आल्यावर समर्थकांनी (Supporters) त्यांना पेढे भरवत जल्लोष साजरा (celebration) केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी परिसरात मिठाई वाटून आनंद साजरा केला.

यावेळी बोलताना रमेश थोरात म्हणाले की, गट तट विसरून गेली ३७ वर्षे तालुक्यातील व जिल्ह्यातील सभासदांची कर्ज वाटप सेवा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच जिल्हा बँक देशामध्ये अव्वल बनली आहे.

हा विजय सर्वसामान्य सोसायटी सभासद दौंड तालुक्यातील जनता, शेतकरी, व मतदारांना समर्पित करतो असे रमेश थोरात म्हणाले.

Advertisement