ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

आमिर खान-किरण राव यांचा घटस्फोट

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी गेल्या १५ वर्षांपासूनच्या वैवाहिक जीवनाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे. ते विभक्त होणार आहेत.

घटस्फोटामागील कारण गुलदस्त्यात

आमिर खान आणि किरण राव यांनी संयुक्त निवेदन जारी करुन या निर्णयाविषयी माहिती दिली. आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे.

त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे, तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू,” असे या निवेदनात म्हटले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी मोठं काम

दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आमिर खान यांच्याबरोबर किरण राव शेताच्या बांधावर गेल्या होत्या. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे त्यांनी पालथे घातले. अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी ‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून मोठं काम केलं.

यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने त्यांची वेळोवेळी स्तुती केली. त्यांना भक्कम पाठिंबा दिला. किरण राव आणि आमिर खान या दोघांनी कित्येक गावांमध्ये पाण्याच्या रूपाने नवसंजीवनी आणली.

जिथं गेली अनेक दशकं माळरान होतं तिथं हिरवी स्वप्न फुलवली. आमिर खान, किरण राव आणि संपूर्ण पाणी फाउंडेशनच्या टीमने महाराष्ट्रातला दुष्काळ हटवण्यासाठी मोठं काम केलं.

 

You might also like
2 li