बारामती – दिवाळीचा उत्सव हा (Diwali) फराळ व फटाक्यांची आतीषबाजी, आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघणारा आहे. दिवाळी (Diwali) हा दिपोत्सावाचा सण, “ज्या ठिकाणी अंधार आहे, त्या ठिकाणी उजेड देणे’ हाच संदेश या सणाचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोना (Corona) महामारीच्या साथीमुळे सर्वांनाच दिवाळीचा सण निर्बंधांमध्ये साजरा करावाला लागला होता. मात्र, यंदाच्या वर्षी करोनाचा (Corona) आलेख पूर्ण पणे खाली आला असून, मोठ्या आनंदात दिवाळीचा (Diwali) सण साजरा होत आहे.

आणि याच निमित्ताने पुणे शहरातील किल्ले सिंहगडावर (sinhagad fort) देखील विद्युत रोषणाई करण्यात आली असून, रविवार पासून ही रोषणाई नागरिकांच्या साठी खुली करण्यात आली आहे.

सिंहगडावर (sinhagad fort) विद्युत रोषणाई करण्याची सुरवात दिवंगत आमदार रमेश वांजळे (ramesh wanjale) यांनी १३ वर्षांपूर्वी केली होती. यंदा पुन्हा त्यांच्या परिवाराकडून दिवाळीच्या निमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली.

अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून दीपावलीचा मांगल्याचा हा सण ओळखला जातो. आनंद आणि उत्साहाने असे सण साजरे करतो. सह्याद्रीतील गडकिल्ले महाराष्ट्राचे सांस्कृतीक वैभव व आभुषणे आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या असंख्य लढवय्या शिलेदारांचे पराक्रमाचे- शौर्याचे प्रतीक समजल्या जाणार्या गडकिल्ल्यांचे आणि मावळ्यांचे स्मरण या निमित्ताने होत असते. दिवाळी आणि किल्ले तयार करणे ही एक परंपरा झाली आहे.

शहराच्या जवळचा आणि खडकवासला मतदारसंघातील सिंहगड हा किल्ला माझ्या वांजळे कुटुंबासाठी आणि परिवारासाठी कायमच प्रेरणास्थान आहे. माझे वडील रमेश वांजळे हे नेहमीच या गडाचे विकासाठी प्रयत्नशिल राहिले होते.

सामाजिक जीवनात कार्य करताना आणि जीवनाची वाटचाल करताना आई हर्षदा वांजळे, चुलते शूक्राचार्य वांजळे, भाऊ मयूरेश वांजळे यांना सिंहगड खर्या अर्थाने प्रेरणाच देतो. असं यावेळी माजी नगरसेविका सायली वांजळे म्हणाल्या.

तर दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच, शिवाजीनगर परिसरातील एसएसपीएमएस शाळा प्रांगण येथे दिवाळी पाडव्याच्या दिवशी “श्री छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव” पर्व ११ वे चे आयोजन करण्यात आले होते.