पुणे – दिवाळीचा उत्सव हा (Diwali) फराळ व फटाक्यांची आतीषबाजी, आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघणारा आहे. दिवाळी (Diwali) हा दिपोत्सावाचा सण, “ज्या ठिकाणी अंधार आहे, त्या ठिकाणी उजेड देणे’ हाच संदेश या सणाचा आहे. नुकतंच पुण्यातील कोथरूड परिसरात नागरिकांची दिवाळी अतिशय आनंदात झाल्याचे पाहायला मिळाले.

नुकतंच आयोजित केलेल्या ‘सुरोत्सवा’मुळे कोथरुड (Kotharud) वासीयांची दिवाळी गोड आणि संगीतमय झाली, असे प्रतिपादन माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी केले. निमित्त होते. कोथरुड मध्ये नुकतंच आयोजित फराळ वाटपात ते बोलत होते.

कोणतीही निवडणूक नाही पण सामाजिक बांधिलकी जपत गरजवतांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम हा स्त्युत उपक्रम आहे. असेही मोहोळ (Murlidhar Mohol) म्हणाले.

वाढत्या महागाईत दिवाळी फराळाचे साहित्यही महागल्याने गोरगरिबांना दिवाळी साजरी करणे शक्य होत नाही. या गोरगरीबांना मदतीचा हात म्हणून हर्षाली दिनेश माथवड आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश माथवड यांच्या वतीने नॉर्थ डहाणूकर मैदान,

कोथरूड पुणे येथे नुकतंच सुमारे 5 हजार नागरिकांना दिवाळी फराळचे वाटप करण्यात आले आहे. हे फराळ वाटप माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले .

केवळ नागरिकच नाही, तर पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच कोथरूड भागातील रस्त्यावरील गरीब लोकांनाही यावेळी दिवाळी फराळचे वाटप करण्यात आले आहे.