Breaking News Updates of Pune

केस गळती रोखण्यासाठी करा ‘हा’ घरगुती उपाय

ऐन तारुण्यात अनेकांना केसगळतीची समस्या उद्भवते. अनेक महागडे उपाय करूनही यावर काही परिणाम दिसत नाही. यासाठी आम्ही एक घरगुती उपाय सांगणार आहोत.

यामुळे तुमची केसगळती कमी होऊन केसांना पोषण भेटेल. कढीपत्ता आणि जास्वंदाच्या फुलांच्या तेलाने केस गळतीपासून काहीसा आराम मिळू शकतो.

साहित्य- 100 ग्रॅम नारळाचे तेल, 3- 4 चमचे एरंडेल तेल, 4 -5 जास्वंदाचे फुले, 3 मूठ कडीपत्ता, 3 चमचे तीळ, 3 चमचे मेथीदाणा, 1 वाटी किसलेला कांदा, किसलेला आवळा, आणि आलं. कृती- सर्वप्रथम नारळाच्या तेलात कडीपत्ता,

जास्वंदाची फुले, तीळ, मेथीचे दाणे, किसलेला कांदा, किसलेला आवळा, आलं घालून गॅस वर मंद आचेवर ठेवावे. गॅस मंदच असावा. नाहीतर तेल जळू शकते. सर्व रसांचा अर्क नारळाचा तेलात उतरल्यावर गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवावे.

हे आयुर्वेदिक तेल आठवड्यातून दोनदा लावल्याने केसगळतीच्या त्रासा पासून आराम मिळतो. आणि केसगळती थांबते. गरज असल्यास एरंडेल तेलसुद्धा टाकावे. अजून चांगले परिणाम मिळतात.

Leave A Reply

Your email address will not be published.