मर मर मेहनत करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यामुळे खासगी नोकरी सोडली. नियुक्ती न झाल्यानं बेरोजगारच राहिले. या काळात कोरोनानं घरातील तीन व्यक्ती गमावल्या.

कर्जबाजारी झाले. आता नोकरी नसल्यानं आत्महत्या करायची का, असा उद्विग्न करणारा सवाल भावी नायब तहसीलदारानं केला.

आयुष्य जगलेच नाही हो…!

”खाजगी नोकरी करत पुण्यात स्पर्धा परीक्षेची अभ्यास केला…मी आयुष्य जगलेच नाही हो, कुठे फिरायला नाही की कधी चित्रपट पाहिला नाही. एकच गोष्ट डोळ्यासमोर होती जोमानं अभ्यास करायचा आणि अधिकारी व्हायचं.

Advertisement

यासाठी पुण्यात वणवण फिरले, सहा सात वर्षे अभ्यास केला. तुम्हाला काय सोपं वाटत का हे? या सर्वाcचा फार मानसिक त्रास होतो.

एका बाजूला आर्थिक ताण, दुसऱ्या बाजूला आपण अयशस्वी झालो तर पुढं काय असे अनेक प्रश्न सोबत घेऊन जगले. या कष्टाचे फळ गेल्यावर्षी मिळालं. माझी नायब तहसीलदार म्हणून निवड झाली. पण येथेच माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

दुःखाचा कोसळला डोंगर

गेल्या वर्षभरात माझे वडील, आई आणि भाऊ मृत्यू पावले. अक्षरश माझ्या अंगावर दुःखाचा डोंगर कोसळला. शासकीय नोकरी मिळाली म्हणून खासगी नोकरी सोडली.

Advertisement

दवाखान्यच्या झालेल्या बिलाच मोठं कर्ज माझ्या अंगावर आहे.त्यात मी माझी निवड होऊनही बेरोजगार आहे, तुम्ही आम्हालाही आत्महत्या करायला लावणार का? असा प्रश्न सोनाली भाजीभाकरे या तरुणीनं प्रशासनाला विचारला आहे.

जगायचं कसं ?

अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने राज्य लोकसेवा आयोगाची सोनाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर मुलाखत होवून नायब तहसीलदारपदासाठी निवडी ही झाली; परंतु गेल्या वर्षभरापासून तिला नियुक्ती पत्रच मिळाले नाही.

त्यामुळे हातची खासगी नोकरी ही गेली. अशातच तिच्या आई, वडील आणि एका भावाचे कोरोनामुळे निधन झाले.

Advertisement

ही दुर्दैवी कहाणी आहे माढा तालुक्यातील कुर्डू गावच्या सोनाली भाजीभाकरे या तरुणीची. आता जगायचं कसं हाच प्रश्न तिला सतावू लागला आहे.

विद्यार्थ्याचं मनोबल खचले

परीक्षेचा निकाल गेल्या वर्षी लागला. त्यानंतर दोन महिन्यांत या नियुक्त्या होणे अपेक्षित होते; मात्र सरकारने त्या न केल्याने ९ सप्टेंबर २०२० च्या मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कचाट्यात या नियुक्त्या सापडल्या.

५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर इतर नियुक्त्या देण्याचा उल्लेख केला.

Advertisement

त्यानंतर दोन महिने उलटून गेल्यानंतरही राज्य सरकारने त्यावर अद्याप निर्णय घेतला नाही. सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे हजारो विद्यार्थ्यांचे मनोबल खचू लागले आहे

 

Advertisement