बहुतेक लोक स्वयंपाकघरात काहीतरी तळल्यानंतर उरलेले तेल इतर गोष्टी बनवण्यासाठी वापरतात. हे प्रत्येकाच्या घरात सामान्य आहे. पण एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरणे किती धोकादायक असू शकते हे तुम्हाला माहिती आहे का?

उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. जाणून घ्या यापासून होणाऱ्या आजारांबद्दल

तेल गरम करताना, त्यातून टॉक्सिन बाहेर पडते. वारंवार ते गरम केल्यावर त्यात असलेले चरबीचे रेणू तुटू लागतात. ज्याला दुर्गंधी येते, ह्यामुळे आपले अन्न खराब होते.

Advertisement

कोलेस्टेरॉल वाढवते

अनेक वेळा गरम तेलात बनवलेले अन्न खाल्ल्याने त्यात असलेली चरबी शरीरात जाते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.

यकृताचा कर्करोग

वारंवार गरम केलेले तेल किंवा उरलेले तेल कर्करोगाची शक्यता वाढवते. हे आपल्याला कोलन कर्करोग, पित्ताशय कर्करोग, यकृत कर्करोग आणि इतर प्रकारचे कर्करोग देखील देऊ शकते.

पोटाशी संबंधित समस्या

उरलेल्या तेलामध्ये शिजवलेले अन्न आपल्याला पोट आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांचे बळी ठरू शकते. यामुळे तुम्हाला अल्झायमर, अॅसिडिटी आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात.

Advertisement