ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

डाॅक्टर दांपत्याची आत्महत्या

किरकोळ कारणावरून वाद होऊन नवविवाहित डाॅक्टर दांपत्यानं आत्महत्या केली. ज्यांनी इतरांना जीवदान द्यायचं, समुपदेशन करायचं, तेच जगणं नाकारून इहलोकाची यात्रा संपवित असतील, तर इतरांनी काय करायचं, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे.

हे आहे दांपत्याचे नाव

राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या दिवशीच वानवडीतील डॉक्टर दाम्पत्याने गळफास घेतला. वानवडी आझाद नगर परिसरात राहणा-या डॉक्टर पती, पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. निखील शेंडकर आणि अंकिता शेंडकर असं आत्महत्या करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याचं नाव आहे.

काय घडलं ?

डॉ. निखील आणि अंकिता शेंडकर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले होते. हे दोघेही प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स होते. काल सायंकाळी निखील घरी येत असतानाच त्याचं फोनवरून पत्नी अंकिताशी भांडण झालं झाला.

हे भांडण इतकं विकोपाला गेलं की दोघांनी आरडाओरड केला आणि अखेर अंकिताने फोन ठेवून दिला. निखील घरी आल्यावर अंकिता दरवाजा उघडत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा डॉ. अंकिता हिने घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आढळून आले.

त्यांनी रात्री आठ वाजता ही माहिती वानवडी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस त्यांच्या घरी पोहचले. त्यांनी अंकिता यांना खाली उतरवून ससून रुग्णालयात नेलं. तिथं डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितले.

गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह त्यांचा भाऊ ओमकार दत्तात्रय तळेकर (रा. उरुळी कांचन) यांच्या ताब्यात दिला.

टोकाचा वाद कशासाठी ?

अंकितानं आत्महत्या केल्यानं निखीलला मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्यानंही ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं; मात्र आत्महत्या करण्याइतकं टोकाचं पाऊल उचलण्याइतका कोणता मोठा वाद या दोघांमध्ये झाला?

ते फोनवरुन क्की कोणत्या कारणावरून भांडत होते, हे अद्याप समजू शकलं नाही. ही घटना आज सकाळी ७ वाजता उघडकीस आली.

You might also like
2 li