मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदमध्ये (Press conference) भाजपवर (BJP) हल्लाबोल केला होता. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कडव्या शब्दात राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील मीडियाशी संवाद साधताना म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बदनाम करून उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना खुर्ची खाली करण्यास भाग पाडायचे आहे का?

विरोधकांना उसकवून संजय राऊत यांना स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असा सवाल करतानाच तुमच्या गळ्याशी आल्यानंतर हे सगळे तुम्हाला आठवले का?

Advertisement

तुम्ही भाजपच्या नेत्यांवर आरोप केल्यावर मी शांत बसायचं हे कसे होईल? अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे लोक आहेत, हे सगळे भांबावून गेले आहेत. पक्षाच्या नेत्यांना बोललेले आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (sanjay raut) यांनी दिला आहे.

तसेच मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे. माझा आणि राऊत किंवा पवार यांच्या बांधाला बांध नाही. राऊतांना शेतीतील कळत नाही. त्यामुळे त्यांचा प्रश्नच येत नाही. पण किरीट सोमय्या (kirit somaiya) हे माझे नेते आहेत.

देवेंद्र फडणवीस हे माझे सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्यावर आरोप केल्यावर मी बोलायचे नाही? असा सवालच पाटील यांनी राऊत यांना केला आहे.

Advertisement

दरम्यान, संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या प्रकरणात पडू नये, बेगाने शादी में नाचू नये. लोक सोमय्यांची धिंड तर काढतीलच, पण तुमचेही कपडे फाटतील, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांना दिला होता.

 

Advertisement