नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद मोदी (PM Narendra Modi) यांनी राजसभेत (Rajyasabha) जोरदार भाषण केले होते. यावेळी त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचे कौतुक करत काँग्रेसवर (Congress) सडकून टीका केली आहे. मात्र त्यांच्या या टीकेला सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

त्या म्हणाल्या की, पंतप्रधानांना वारंवार महाराष्ट्रावर टीका करून काय आनंद मिळताे? ज्या राज्याने त्यांना सत्तेच्या शिखरावर पाेहाेचविले आहे, त्या राज्याप्रती त्यांच्या मनात घृणा का आहे, याचे मला आश्चर्य वाटते.

तसेच पुढे त्यांनी महाराष्ट्र (Maharashatra) कधीही दिल्लीसमाेर वाकला नाही आणि कधी वाकणारही नाही असे सांगितले . त्याचसोबत माेदींवर विराेधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही टीका केली आहे.

Advertisement

मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले की, पंतप्रधान अभिभाषणावर न बाेलता काँग्रेसविराेधात बाेलत हाेते. हे माेदींचेच फाेडा आणि राज्य करा असे धाेरण आहे.

त्याचबरोबर काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी ट्वीट करून माेदींना प्रत्युत्तर दिले. त्यांनी लिहिले की, कधी काळी दाेन खासदार असलेला पक्ष आज काँग्रेस आहे म्हणूनच सत्तेत आहे.

दरम्यान मोदींनी भाषणात तीन वेळा शरद पवार यांचे नाव घेत कौतुक केले आणि राहुल गांधी यांनी पराजयाचा सामना करायला हवा, नाहीतर पक्षासोबत पक्षाअंतर्गत व्यक्तीही नाराज होतील असा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी राहुल गांधी यांना दिला होता.

Advertisement