हिंदू शास्त्रानुसार शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मी चा दिवस मानला जातो. शास्त्रानुसार जो भक्त शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करेल त्याची आर्थिक तंगी दूर झाल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले जाते.

शुक्रवारच्या दिवशी केवळ पूजापाठ नाही तर दानधर्म केल्याने देखील मोठ्याप्रमाणावर पुण्य प्राप्त प्राप्त होते. शुक्रवारच्या दिवशी काही खास गोष्टी दान केल्याने तुम्हाला अतीव पुण्याच्या प्राप्ती सोबतच इतरही अनेक लाभ होऊ शकतात.

शुक्रवारच्या दिवशी तुम्ही शुक्र साठी दान पुण्य करू शकता. ज्याचे शुक्र ग्रह चांगले नाही ते हे हे दान करू शकतात. दान करण्यासाठी खालील सामग्री वापरावी.

Advertisement

1 मिस्त्री
2 तांदूळ
3 दही
4 पांढरे कापड
5 चांदी

या सर्व गोष्टी शुक्रवारच्या दिवशी दान केल्याने भक्तांना पुण्य लाभ होईल.

शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मी चे पूजन करावे. शक्य असल्यास सवासणी जेवू घालाव्या. त्यासोबतच त्यांना सौभाग्याच्या वस्तू द्या जसे की कुंकू,चुडा, लाल साडी इत्यादी.

Advertisement

शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करणे चांगले समजले जाते. खास करून सुवासिनींनी लाल रंगाची साडी घालावी माता लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे.

तामसी भोजन टाळावे

शुक्रवारच्या दिवशी कसल्याही प्रकारचे तामसी भोजन करू नये जसे की मास, मासे, मद्य. सोबतच शुक्रवारच्या दिवशी कोणत्याही जीवजंतूंना हनी पोचवता शकते नये अन्यथा माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते.

स्त्रियांचा अपमान करू नका

ऋग्वेदामध्ये हे स्पष्ट केले आहे की ज्या घरात स्त्रियांचा सन्मान होत नाही त्या घरात लक्ष्मीचा कधीच वास होत नाही त्यामुळे स्त्रियांचा नेहमी आदर करावा.

Advertisement