अवयदानामुळं अनेकांना जीवदान मिळतं, हे अलीकडच्या काळात सर्वांना पटायला लागलं आहे. त्यामुळं अवयवदान करण्याचं प्रमाण वाढलं आहे.

त्याचा फायदा दुस-या नागरिकांना जीवदान मिळण्यात होत आहे. अशाच एका मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या हृदयदानामुळं एका शेतक-याच्या पत्नीला नवजीवन मिळालं आहे.

मुलाचा अवयवदानाचा होता संकल्प

रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या १४ वर्षीय मुलाला डॉक्टरांनी मेंदूमृत घोषित केलं. त्यामुळे जिवंत असूनही हा तरुण जिवंत नव्हता.

Advertisement

पिंपरी-चिंचवडमधील या मुलानं अवयवदानाचा संकल्प केला होता. त्याच्या हृदयदानामुळं सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांच्या पत्नीला नवजीवन मिळालं आहे.

सह्याद्री हाॅस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया

डेक्कन येथील सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नुकतेच हे हृदय प्रत्यार्पण करण्यात आले. त्यासाठी पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयातून या तरुणाला ग्रीन कॉरिडॉरद्वारे सह्याद्री रूग्णालयात आणण्यात आले होते.

याबाबत रुग्णालयाचे हृदय प्रत्यारोपण विभागाचे संचालक डॉ. मनोज दुराईराज म्हणाले, ‘सांगली जिल्ह्यातील २९ वर्षीय महिलेला २०१६ पासून रेस्ट्रीक्टिव्ह कार्डिओमायोपथी या आजाराचा त्रास होता. त्यांची परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून खालावत होती.

Advertisement

त्यामुळे हृदय प्रत्यारोपण करणे गरजेचे होते. हृदय प्रत्यारोपणानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.’ प्रत्यारोपण टीममध्ये डॉ. मनोज दुराईराज, डॉ. राजेश कौशिश आणि डॉ. दीपक भौसार यांचा समावेश होता.

सह्याद्री हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्रारअली दलाल म्हणाले, ‘हृदय प्रत्यारोपणात सामील झालेली डॉक्टरांची टीम व झेडटीसीसी समन्वयक आरती गोखले, तसेच ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेले काम महत्त्वपूर्ण आहे. अवयव दात्याच्या कुटुंबामुळे एका रुग्णाला एक नवसंजीवनी मिळाली आहे.’

 

Advertisement