“सरकारने लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये, नाहीतर ही जनता सरकारचा अंत केल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

कोरोना नियंत्रणात तरी निर्बंध कायम

मुंबईत कोरोनाची स्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणावर घटली आहे; पण अजूनही सरकारने निर्बंध शिथील केलेले नाहीत.

त्यामुळे सर्वसामान्य जनता, व्यापारी आदी सर्वांमध्ये सरकार विरोधात नाराजीची भावना आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येईल, अशी भीती वारंवार दाखवली जात आहे.

Advertisement

विरोधी पक्षाचे नेते आणि व्यापारी वर्ग जाहीरपणे आपल्या मनातील खदखद व्यक्त करत आहे; पण अजूनही निर्बंध शिथील करण्याच्या दृष्टीने कुठलीही पावलं उचलण्यात आलेली नाहीत.

निर्बंध पूर्णतः उठवण्याची मागणी

लोकल इतक्यात सुरू होणार नाही, असं सरकारी सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं जातं आहे. त्यामुळे नागरिकांच्या असंतोषामध्ये भर पडत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे मागच्या काही दिवसांपासून सातत्याने सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत. आर्थिक दृष्टीने विचार करून, पूर्णपणे अनलॉकची मागणी करत आहेत.

Advertisement

हेही वाचा: इंधन दरवाढीविरोधात आंदोलन म्हणजे नौटंकी- देवेंद्र फडणवीस

व्यापा-यांचं नुकसान

सरकारने पहिल्या दोन लेव्हल काढून टाकल्या आहेत. मुंबई सुरुवातीपासूनच लेव्हल तीन मध्येच आहे.

त्यामुळे मुंबईत व्यापाऱ्यांना फक्त सायंकाळी चारपर्यंतच दुकाने खुली ठेवण्याची परवानगी आहे. सरकारच्या या भूमिकामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे.

Advertisement

लोकल सुरू करण्यासाठी प्रवासी संघटना आक्रमक

लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. लोकल सुरू करण्यासाठी प्रवासी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लोकल सुरू करण्याबद्दल पत्र लिहिलं.

लोकलवर बऱ्याच लोकांचे रोजगार अवलंबून आहेत. लोक सध्या प्रवासात हाल सहन करून नोकरीचं आपलं ठिकाण गाठत आहेत. लवकर सर्वकाही अनलॉक व्हावं हीच जनतेची मागणी आहे.

Advertisement