मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांना एक सल्ला दिला आहे. त्यामध्ये त्यांनी तो सल्ला काळजीपूर्वक पूर्ण कर असे सांगितले आहे.

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात मिसेस फडणवीस सहभागी झाल्या आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video conferencing) कार्यक्रमात सहभागी झाले होते.

या कार्यक्रमादरम्यान प्रश्न सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने (Sankarshan Karhade) देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही अमृता वहिनींना कोणता सल्ला द्याल असा प्रश्न विचारला होता. यावर ते म्हणाले होते की, “तिथे गेल्यावर जे काय पदार्थ तू बनवणार आहेस, त्यासोबत नवनवीन पदार्थ शिकता आले तर शिक आणि ते बनव आणि मला खाण्यापासून रोखू नकोस.

Advertisement

खाण्यातली मजा ही जीवनातल्या एका मोठ्या आनंदासारखी आहे. हा आनंद मला सतत मिळत राहायला पाहिजे, याची कृपया काळजी घे” असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

तसेच पुढे संकर्षणने देवेंद्रजी तुम्हाला कोणता पदार्थ उत्तम करता येतो, असा प्रश्न विचारला होता. त्यावर “मला चहा, डोसा, अंडा करी, ऑम्लेट, पोहे असे अनेक पदार्थ चांगले बनवता येतात” असे फडणवीस म्हणाले.

त्यानंतर मिसेस फडणवीस यांना तुम्हाला त्यांच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो, असा प्रश्न संकर्षणने विचारला होता. यावर त्यांनी, “त्यांच्या हातचा डोसा खूपच चांगला असतो, एकदम क्रिस्प डोसे बनवतात ते.

Advertisement

त्यासोबतच बटाट्याची भाजी आणि सांबारही छान बनवतात ते.” असे अमृता म्हणाल्या. इतक्यावरच न थांबता, “आधी दरवेळेस जेव्हा आमची बाई नाही यायची, तेव्हा देवेंद्रजींकडून मी आवर्जून डोसे बनवून घ्यायचे” असे उत्तर अमृता फडणवीस यांनी वेळी दिले आहे.