पुणे : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर १०० कोटींचा घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत. त्यांनतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या आणि भाजपवर टीका केली आहे.

संजय राऊत आज पत्रकार परिषद (Press Conference) घेऊन कोणता गौप्यस्फोट करणार तसेच भाजपचे कोणते साडे तीन लोक आत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांची आज शिवसेना भवनात (Shivsena Bhawan) पत्रकार परिषद होणार आहे.

त्यावरून किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि शिवसेनेला टोला लगावला आहे. ते म्हणाले, मला टाका ना जेलमध्ये, मी येतो बॅग भरून, असे सांगतानाच साडे तीन लोकांना अटक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) मुहूर्त शोधत होते का? असा प्रश्नही त्याची विचारला आहे.

Advertisement

तसेच इश्यू डायव्हर्ट करण्यासाठीच उद्याची पत्रकार परिषद होत आहे. पण मी मुद्द्यावरून हटणार नाही. जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा झाला आहे. सर्वच त्यात सहभागी आहेत. त्यामुळे सर्वच घाबरले आहेत असेही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

उद्या शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. प्रत्येक पक्षाला पत्रकार परिषद घेण्याचा हक्क आहे. सोमय्यांनी गुन्हा केला असेल तर मी कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करणार.

पण इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी कोणी तरी सकाळी उठून पाच पानी पत्र रिलीज करणार… ईडीने डेकोरेटरला बोलवलं डोक्यावर बंदूक ठेवली, असे सांगणार याला काही अर्थ नाही.

Advertisement

ज्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली त्याला समोर आणले पाहिजे. त्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली पाहिजे. त्यांनी पत्रं लिहून पाच दिवस झाले.

ते प्रकरण संपले. म्हणून ते इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी उद्या पत्रकार परिषद घेत आहेत, असा घणाघाती टोला किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

Advertisement