ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

एका दिवसात एक लाख डिजिटल उतारे डाऊनलोड

राज्य सरकारनं आता सात-बारा उतारे ऑनलाईन देण्यास सुरुवात केली आहे. तलाठी कार्यालयात न जाता आता डिजिटल सात-बारा उतारे मिळायला लागले असून, एकाच दिवसात सर्वाधिक एक लाख सात-बारा उतारे डाऊनलाड झाले असून, हा एक विक्रम आहे.

सर्वाधिक ३१ लाखांचा महसूल जमा

महसूल विभागाने शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन सातबारा उतारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने डिजिटल सातबारा उतारा ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सुविधांमुळे सामान्य शेतकऱ्यांच्या जमीनविषयक आणि सातबाराबाबतच्या अनेक समस्या दूर झाल्या आहेत. याबरोबरच इतर ऑनलाईन सेवाही विभागाच्या वतीने सुरु करण्यात आल्या आहेत.

एकाच दिवसात सर्वाधिक सर्वाधिक ३१ लाख ५० हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. सोमवारी हा नवा उच्चांक नोंदला गेला आहे.

महाभूमी पोर्टल खातेदारांच्या पसंतीस

राज्य सरकारने डिजिटल स्वाक्षरीत सातबारा, खाते उतारे आणि मिळकत पत्रिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी महाभूमी पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल सध्या सर्वच खातेदारांच्या पसंतीस उतरले आहे.

सोमवारी झालेली एका दिवसाची नोंद

  • ऑनलाइन दस्त नोंदणीची संख्याः ४,५३१
  • ऑनलाइन फेरफार संख्याः १२,१३२
  • ऑनलाइन निर्गत फेरफारची संख्याः १०,०६३
  • नोटीस तयार केलेल्या फेरफारची संख्याः ११,०१३
  • तलाठी स्तरावरून अभिलेख वितरण प्रणालीतून वितरीत सातबारा व खाते उतारे संख्याः २ लाख ८६ हजार ५८०.
  • पीक कर्जासाठी बँकांनी घेतलेल्या ऑनलाइन सातबारा व खाते उतारे संख्याः १० हजार.
  • पीक विमा योजनेसाठी वापरलेल्या सातबाराची संख्याः १ लाख ३४ हजार.
  • भूलेखवरून मोफत मिळविलेल्या सातबाराः ५ लाख २ हजार.
  • एका दिवसात नक्कल शुल्कद्वारे जमा झालेला महसूलः ३१ लाख ५० हजार रुपये.

 

 

You might also like
2 li