पुणे : देशाचे गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांचा पुणे (Pune) दौरा सुरु आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी (Municipal elections) भाजपला (BJP) अमित शहांच्या दौऱ्यामुळे नक्कीच फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.

महापालिकेतील कार्यक्रम उरकल्यावर भाजपचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी बोलताना अमित शहा यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार टीका केली आहे.

यावेळी बोलताना शहा यांनी काँग्रेसवर (Congress Party) सडकून टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या अपमानाची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही.

Advertisement

सत्ता असताना त्यांना भारतरत्न (Bharat Ratna) हा सर्वोच्च पुरस्कार दिला गेला नाही. तो देण्याचे काम बिगर काँग्रेस सरकारकडूनच करण्यात आले.

डॉ. आंबेडकर संसदेत निवडून येऊ नयेत, यासाठी काँग्रसने प्रयत्न केले, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.

संविधान दिनाला काँग्रेसने विरोध केला. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सरकार चालवीत आहेत, असेही शहा यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

शहर विकासासाठी केंद्र सरकारे कटिबद्ध असून शहरासाठी विविध योजना राबविल्या जात असल्याचेही अमित शहा यांनी सांगितले. स्वराज्य आणि स्वधर्म हे शब्द उच्चारण्याची भीती वाटावी, अशी परिस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घटना निर्मितीमधील योगदान अमूल्य आहे. संपूर्ण जीवनात त्यांना अवहेलना, अपमान सहन करावा लागला. त्याचा परिणाम त्यांनी घटनानिर्मितीवर होऊ दिला नाही. असेही अमित शहा म्हणाले.

Advertisement