Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

‘डीआरडीओ’ची बिजिंग सिस्टीम लष्करात दाखल

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या ‘शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टीम (एसएसबीएस)- १० मीटर’ या प्रणालीला सैन्यदलात दाखल करण्यात आले.

दिल्लीच्या परेड ग्राऊंडमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या उपस्थितीत पहिल्या खेपेतील १२ पूल सैन्यदलाला मिळाले.

सैन्याची चपळता वाढणार

देशाच्या पश्चिमी सीमेवरील नद्या तसेच देशातील विविध सीमाभागातील असलेल्या भौगोलिक अडथळ्यांना जलदगतीने पार करण्यासाठी आणि भारतीय सैन्याची चपळता वृद्धिंगत करणाऱ्या ‘ब्रिजिंग सिस्टीमचा सैन्यदलात समावेश झाला आहे.

डीआरडीओच्या पुण्यातील अभियांत्रिकी प्रयोगशाळेतील ‘संशोधन व विकास आस्थापना’ (आर अँड डी ई) (इंजिनिअर्स) यांनी एल अॅण्ड टी लि. यांच्या सहकाऱ्याने या प्रणालीची रचना व विकास केला आहे.

आत्मनिर्भर भारतसाठी मदत

या कार्यक्रमाला डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी, पुण्यातील प्रयोगशाळेचे संचालक प्रदीप कुरुलकर आदी उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय सैन्यदल व उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले आहे.

ते म्हणाले, की या प्रेरणेमुळे वेगाने वाढणाऱ्या भारतीय संरक्षण औद्योगिक परिसंस्थेला चालना मिळेल आणि उद्योगाला ‘आत्मनिर्भर भारत’ साठी योगदान देण्यात मदत होईल.

 

Leave a comment