मुंबई – 2015 साली रिलीज झालेला अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘दृश्यम’ हा चित्रपट आजही लोकांच्या मनात घर करून आहे. चित्रपटाच्या कथेपासून ते अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बूच्या (Tabu) अभिनयापर्यंत प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. आजही ऑक्टोबर महिन्यात ‘दृश्यम’चे संवाद लोकांच्या ओठावर रुळतात. आता पुन्हा एकदा अजय देवगण (Ajay Devgn) चाहत्यांना एक मोठी भेट देणार आहे. अलीकडेच त्याने ‘दृश्यम 2’ ची घोषणा केली होती, त्यानंतर चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. आता ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.

‘दृश्यम 2 टीझर’ (Drishyam 2) चा फर्स्ट लूक शेअर करताना, अजय देवगणने कॅप्शनमध्ये लिहिले की, “2 किंवा 3 ऑक्टोबरला काय घडले ते लक्षात ठेवा? विजय साळगावकर पुन्हा एकदा आपल्या कुटुंबासह परतले आहेत.”

एका वापरकर्त्याने हा चित्रपट सर्वात हिट ठरेल अशी टिप्पणी केली असताना, दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, “शेवटी तो पुन्हा आपल्या कुटुंबासह परत आला आहे.”

‘दृश्यम 2’च्या पोस्टरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही नमूद करण्यात आली आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी 18 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

अजय देवगण, तब्बू, रजत कपूर, श्रेया सरन आणि इशिता दत्ता मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय आणखी एका अभिनेता अक्षय खन्ना याचं नावही या चित्रपटात सामील झालं आहे.

जय देवगणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘थँक गॉड’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे. इंदर कुमार दिग्दर्शित हा चित्रपट 24 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.