ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

भर दिवसाही वाहन चो-या

पिंपरी : शहरात दररोज चार ते पाच वाहने चोरीला जात असून वाहनचोर भरदिवसाही वाहनांची चोरी करू लागले आहेत. सोमवारी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सात दुचाकी आणि दोन सायकलची चोरी झाली असून संबंधित पोलिस ठाण्यांत वाहनचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाहनचोरी रोखण्यात अपयश

पिंपरी चिंचवड शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.पोलिसांना शहरातील वाहनचोरी रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. इतके दिवस चारचाकी, दुचाकी यांच्या चोरीने पिंपरी चिंचवडकर हैराण झाले होते;

मात्र याच दरम्यान पिंपरी चिंचवडमधील नागरिकांच्या आणखी चिंतेत भर पडली आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सात दुचाकी आणि दोन सायकलची चोरी झाली असून संबंधित पोलिस ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात वाहनचोरीप्रकरणी पिंपरी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, चाकण भोसरी, निगडी या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाहने चोरीच्या घटना

अमित एकनाथ चव्हाण (वय ३२, रा. चिंचवड) यांनी दुचाकी चोरी प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चव्हाण यांनी त्यांची दुचाकी १६ जुलै रोजी थरमॅक्स चौकात पार्क केली असताना अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली.

अमोल मोहन हांडे (वय ३२, रा. दिघी रोड भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २६ जून रोजी भोसरी येथिल सार्वजनिक रस्त्यावर दुचाकी पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली.

चिंचवड येथून एकाच व्यक्तीच्या दोन सायकलची चोरी…

चिंचवड येथे बाजीराव सदाशिव नाईक (वय ४२, रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड) यांच्य घराच्या पार्किंगमधून दोन सायकलची चोरी झाली आहे. या प्रकरणी त्यांनी चिचंवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायकल चोरीचा हा प्रकार सात ते १५ जुलै दरम्यान घडला आहे.

अज्ञात व्यक्तीने नाईक यांच्या घराच्या पार्किंगमध्ये असलेली चार हजार रुपये व दोन हजार रुपये किंमत असलेल्या दोन सायकल चोरून नेल्या.

You might also like
2 li