पुणे – पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून अमली पदार्थांची (drugs) तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरुणाई व्यसनाधिनतेकडे वळली आहे. या तस्करांची कंबरडे मोडण्यासाठी पुणे पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई (crime) केली आहे. ही कारवाई पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे तरुण अमली अपदार्थांची विक्री करत होते.

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात सोशल मीडियाच्या माध्यमातून अमली पदार्थाची (मेफेड्रॉन आणि चरस) विक्री करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक (Drug Seller Arrested) केली आहे.

दरम्यान, या तरुणांच्या ताब्यातून सुमारे दोन लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. अनिकेत जनार्दन दांडेकर (वय 20) आणि आकाश महिंद्र ठाकर (वय 22) अशी अटक करण्यात या दोघांची नावे आहेत.

सिंहगड रस्ता परिसरातील अखिल ओमकार मित्र गणेश मंडळ गणेश मंदिरासमोर ही कारवाई (Drug Seller Arrested) करण्यात आली असून, परिसरातात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार., “सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेल चौकातून रामनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी गस्त (Drug Seller Arrested) घालत होते.

यावेळी त्यांना वरील आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून अमली पदार्थ विकत असल्याची माहिती मिळाली होती. नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतली असता सुमारे दोन लाख रुपयाचं मेफेड्रॉन आणि चरस सापडले.

या दोघांविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहे. तसेच, या प्रकरणाची लिंक आणखी कोणाशी जोडली गेली आहे. याचा देखील तपास सुरु आहे.

दरम्यान, गेल्या महिन्याभरापूर्वी पुण्यातील पुणे रेल्वे स्टेशन (pune station) परिसरात देखील अशीच एक मोठी करावी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी आरोपीकडून 11 लाख 80 हजार रुपयांचे 118 ग्रॅम एम डी (मेफेड्रॉन) जप्त केले होते.

याशिवाय त्याच्याकडून मोबाईल, डिजिटल वजन काटा, 2 हजार 590 रुपये रोख, आधारकार्ड, डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त (Drug Seller Arrested) करण्यात आला होता.