पुणे – सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असेत अशा पोलिसांनीच (Police) दारूच्या नशेत (Drunk Pune Police) एका हॉटेलमध्ये धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारमध्ये (Drunk Pune Police) जाऊन धिंगाणा घालणाऱ्या पुणे पोलिस (Drunk Pune Police) दलातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. मुंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये या तीन पोलिसांनी (Drunk Pune Police) तुफान धिंगाणा घातला होता.

तसेच, आणखी दारू (Drunk Pune Police) मिळावी यासाठी या कर्मचाऱ्यांनी हॉटेल मॅनेजर सोबत हुज्जत घालत त्याला मारहाणही केली. दरम्यान, या तीनही पोलीस (Drunk Pune Police) कर्मचाऱ्यावर आता गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री हा सर्व प्रकार घडला.

फरासखाना पोलिस स्टशेनचे पोलिस अमंलदार उमेश मरीस्वामी, समर्थ वाहतुक विभागातील पोलिस अमंलदार अमित सुरेश जाधव आणि चंदननगर पोलिस स्टेशनचे पोलिस अमंलदार योगेश भगवान गायकवाड यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल दशरथ मद्रे यांनी या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलीस अंमलदार उमेश मरीस्वामी मठपती, अमित सुरेश जाधव आणि योगेश भगवान गायकवाड अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबत हॉटेल मॅनेजर कुनाल दशरथ मद्रे (27, रा. घोरपडीगाव) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात मारहाण तसेच मुंबई दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुलगा परिसरातील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करत असताना हे तीनही पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी आले. तिघांनीही बार काउंटरवर मद्य प्राशन केले.

यानंतर आम्हाला आणखी दारू पेयची असून, यावेळी त्यांनी आणखी दारूची मागणी केली. तसेच, शिवीगाळ करीत येथील रोहित काटकर याला हाताने मारहाण केली. एवढेच नाही तर मोठमोठ्या आवाजात धमकी देऊन हॉटेलमधील बार काऊंटरवर धिंगाना घातला.

या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांवर पुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असेत अशा पोलिसांनीच असे कृत्य केल्या मुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.