पुण्याची ओळख पूर्वी सायकलींचे शहर होते. आता त्याची ओळख दुचाकींचे शहर झाली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी एका ठिकाणी सायकल नेऊन दुस-या ठिकाणी सोडण्याची व्यवस्था होती. आता ई-बाईक भाड्याने देण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

चार्जिंगसाठी रस्त्याच्या कडेला जागा देणार

गेल्या वर्षभरापासून शहरात भाडे तत्त्वावर ई बाईक्स धावणार अशी चर्चा सुरू असताना अखेर या प्रस्तावास महापालिकेच्या मुख्यसभेत मंजुरी देण्यात आली.

यामध्ये ई बाईक पुरविणाऱ्या दोन कंपन्यांना बाईक चार्जिंगसाठी शहरात रस्त्याच्या कडेला पाचशे ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Advertisement

दोन कंपन्यांना मान्यता

शहरात धावणाऱ्या लाखो वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते, यास आळा घालण्यासाठी सीएनजी, ई बसेस धावत आहेत. आता ई बाईक्स धावणार आहेत. विट्रो मोटर्स प्रा. लि. आणि ईमॅट्रीक्स माईल या कंपन्यांना हे काम देण्यात आले आहे़.

शहरात विट्रो मोटर्स प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून भाडेतत्वावर ई बाईक पुरविणे तसेच या कंपनीला शहरात पाचशे विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशनसाठी व बाईक पार्किंगसाठी रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध द्यावी असा प्रस्ताव जून २०२० मध्ये शहर सुधारणा समितीने मंजूर केला होता.

जुलै २०२० मध्ये स्थायी समितीने प्रशासनाकडून अभिप्राय घेऊन मान्यता दिली. डिसेंबर २०२० च्या सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवर हा विषय आलेला असताना या प्रस्तावामध्ये महापालिकेकडे ई बाईक्स पुरविण्याची तयारी दर्शविलेल्या ईमॅट्रीक्स माईल या कंपनीचाही समावेश केला.

Advertisement