नवी दिल्ली : देशात ५ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची (5 State Assembly Elections) रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा निवडणका सुरु असताना मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या टीकेची तोफ डागली आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आजारातून बरे झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी भाष्य केले आहे. या भाष्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारवर हल्लाबोल केल्याचे चित्र त्यांच्या भाषणातून दिसत आहे.

परदेशी नेत्यांना जबरदस्ती मिठी मारण्यानं किंवा न बोलवता बिर्याणी (Biryani) खायला जाण्यानं संबंध सुधारत नाहीत अशी जहरी टीका मनमोहन सिंह यांनी मोदींवर केली आहे.

Advertisement

मनमोहन सिंह यांनी त्यांचा व्हिडीओ (Video) ट्विट (Twit) करत त्याला कॅप्शन देखील दिले आहे. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, सरकार को ये भी समझ लेना चाहिए की अपनी सूरत बदल लेने से सीरत नहीं बदलती, जो भी सच है वो हमेशा किसी ना किसी रूप में सामने आ ही जाता है!

Advertisement

बड़ी-बड़ी बातें करना आसन होता है लेकिन उनको अमली जमा पहनाना बहुत मुश्किल होता है असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

मनमोहन सिंह पुढे म्हणाले, आज देशाची स्थिती अशी आहे की, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत तर गरीब अजून गरीब होत चालले आहेत. कोरोना काळात केंद्राच्या वाईट धोरणांमुळं लोक आर्थिक समस्या, बेरोजगारी, वाढत्या महागाईनं त्रस्त आहे.

साडेसात वर्ष सरकार चालवल्यानंतरही भाजप सरकार आपल्या चुका मान्य करायला तयार नाही. भाजप सरकार देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना जबाबदार ठरवत आहे.

Advertisement

सरकारचा राष्ट्रवाद हा नकली आहे तेवढाच धोकादायक देखील आहे. यांचा राष्ट्रवाद हा इंग्रजांच्या तोडा फोडा आणि राज्य करा या धोरणावर चालणारा आहे.

संविधानिक संस्थाना कमजोर केले जात आहे. हे सरकार परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरले आहे असेही मनमोहन सिंह म्हणाले आहेत.

Advertisement