इंधन, भाजीपाला, तेल, किराणा, वाहतूक आदींच्या दरात वाढ होत असल्याने नागरिकांच्या खिशाला चाट बसतो आहे.

कोरोनाने उत्पन्नात घट होत असताना आता महागाईने खिसा आणखी खाली केला जात आहे. त्यात आता चिकनचे दर वाढले.

वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या जनतेला आता चिकनसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. आता ग्रामीण भागात चिकनचे दर वाढले आहेत.

Advertisement

कोरोना काळात मागणी जास्त असल्याने दर वाढले. भाववाढ योग्यच असल्याचं महाराष्ट्र पोल्ट्री असोसिएशननं म्हटलं आहे.

शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी डॉक्टरांनी चिकन, अंडी खाण्याचा सल्ला दिल्यानं दोन्हींचा दर वाढला आहे.

चिकन 240 रुपयांपर्यंत

कोरोना काळात वैद्यकीयतज्ज्ञांनी मांसाहार करण्याचा सल्ला दिल्याने ग्रामीण भागात चिकनला प्रचंड मागणी वाढली आहे.

Advertisement

चिकनच्या दरामध्ये 30 टक्क्यांएवढी वाढ झाली आहे. मागील दहा दिवसांपूर्वी 180 ते 200 रुपये किलो असणारे चिकन आज 240 रुपये किलो झाले आहे.

दरवाढ योग्य

चिकनचा दर 240 रुपयांपर्यंत गेले असताना पोल्ट्री व्यवसायिकांनी त्याचं स्वागत केलं आहे. ही दरवाढ योग्यच असून असाच बाजार भाव राहिला, तरच पोल्ट्री व्यवसाय टिकेल.

अन्यथा हा व्यवसाय अडचणीत येईल असे मत महाराष्ट्र पोल्ट्री असोसिएशन सदस्यांचे आहे.

Advertisement

गेल्यावर्षी खूप संकट

मागील वर्षी बर्डफ्ल्यू व कोरोना काळात चुकीच्या गैरसमजुतीमुळे कुक्कुटपालन व्यवसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते; मात्र जनजागृती झाल्यानंतर व तज्ज्ञांनी चिकन व अंडी खाण्याचा सल्ला दिल्याने नागरिकांकडून चिकनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

महाराष्ट्र पोल्ट्री असोसिएशनचे सदस्य भानुदास देशमुख यांच्या म्हणण्यानुसार ही वाढ योग्य आहे. पोल्ट्री व्यावसायिकानी मोठे नुकसान सहन केलं आहे.

कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे ही वाढ जास्त नसून सध्याचा बाजारभाव योग्य असून असाच बाजारभाव भविष्यात राहिला तर पोल्ट्री व्यवसाय अडचणीतून बाहेर निघेल, असं त्यांनी सांगितलं.

Advertisement

चिकनच्या किंमती का वाढत आहेत ?

पोल्ट्री व्यावसायिक आणि चिकन विक्रेत्यांच्या माहितीनुसार कोंबडी खाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची किंमत गेल्या महिन्यात 30 ते 40 रुपयांवर होती.

ती आथा 60 रुपयांच्या वर गेली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला हाय प्रोटीन सोया मील 52 रुपयांना विकलं जातं होते ते आता 67 रुपयांना विकलं जातं आहे.

या कारणामुळे चिकनच्या किमती वाढल्या आहेत. लॉकडाऊनमुळं पशुखाद्य पुरवणाऱ्यांचं गेल्या आर्थिक वर्षात 26 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं.

Advertisement

उत्तर भारतात बाजारात चिकन170 ते 180 रुपये किलोंना विकलं जात आहे. होळीच्या दिवसांमध्ये चिकन 200 ते 220 रुपये किलो प्रमाणं विकलं जात होतं.

 

Advertisement