Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

चाेरी करणाऱ्यांमागेच ईडी लागते!

राज्यात काेराेना, पूरस्थिती, दुष्काळाची परिस्थिती उद्भवलेली आहे. अशा परिस्थितीत माणसाला जगवण्याचे काेणतेही प्रयत्न हाेताना दिसत नाहीत.

त्यामुळे ठाकरे सरकार हे माणसे जगवणारे सरकार नसून दुर्दैवाने मृत्यू झालेल्यांचे आकडे जाहीर करणारे सरकार असल्याचा आराेप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला.

भाजप साेडून गेलेल्यांची दुर्गती झाली असून चाेरी करणाऱ्यांमागेच ईडी लागते, असा टाेला एकनाथ खडसे यांचा नामाेल्लेख टाळत केला.

Advertisement

शेलार म्हणाले, पूरग्रस्तांची भयावह परिस्थिती पाहता जनतेला मदत करण्याएवजी केवळ पाहणी करणारे सरकार आहे. पॅकेज घाेषित न करणाऱ्या सरकारने पंचनामे पूर्ण न हाेताच तसेच नुकसानीची माहिती न घेताच पॅकेज कसे जाहीर केले, असा सवाल केला.

ठाकरे सरकार हे हवालदिल सरकार असून माणसांना जगवण्याएवजी मेलेल्या माणसांचे आकडे जाहीर करणारे सरकार असल्याचा आराेप केला.

राज्यपालांचा दाैरा त्यांचा अधिकार असून गैरजबाबदारीचे विधान करून सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे शेलार म्हणाले.

Advertisement
Leave a comment